पुणे : खडी बारीक करण्याच्या मोटारी चोरणार्‍या कामगाराला अटक

तब्बल १५ मोटारी जप्त, काळेपडळ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – खडी बारीक करण्यासाठी लागणार्‍या तब्बल १५ मोटारींच्या चोरीचा काळेपडळ पोलिसांनी पर्दापाश केला आहे. प्लँटमध्ये कामाला असलेल्या कामगारानेच मित्राच्या मदतीने मोटारींची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. पथकाने त्याला रामटेकडी परिसरातून ताब्यात घेत त्याच्याकडून १९ लाख रूपये किंमतीच्या संबंधित मोटारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी त्याच्या साथीदाराचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. आकाश संजय मोरे (रा. रामटेकडी हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

बाजीराव रस्त्यावर सायकलस्वार ज्येष्ठाचा मोबाइल हिसकावला – सविस्तर बातमी 

वडाचीवाडी याठिकाणी सुरू असलेल्या खडी क्रशींग कामासाठी लागणार्‍या १९ लाख रूपयांच्या तब्बल १५ विद्युत मोटारी चोरून नेल्याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्याकडून आरोपीचा शोध घेण्यात येत होता. तपास पथकातील पोलीस अंमलदार शाहीद शेख आणि अतुल पंधरकर यांना आरोपी आकाश मोरे याची माहिती मिळाली प्लांटवर कामाला असताना त्याने मित्राच्या मदतीने विद्युत मोटारींची चोरी केल्याची माहिती त्यांना मिळाली.

तपास पथकाने रामटेकडी, हडपसर परिसरात सापळा रचून आकाश मोरे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मित्राचे मदतीने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्यांनी खडी बारीक करण्याच्या १५ मोटारी चोरी करून अज्ञात ठिकाणी ताडपत्रीखाली लपवून ठेवल्या होत्या. नंतर ते भंगार दुकानात विकणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून १८ लाख ९६ हजारांच्या १५ मोटारी काळेपडळ पोलीस तपास पथकाने जप्त केल्या आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, नासीर देशमुख, नितीन ढोले, अतुल पंधरकर, नितीन शिंदे, श्रीकृष्ण खोकले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×