Breking News
वाहन चोराकडुन दोन दुचाकी जप्त, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरीपुण्यातील चोर राजासह तिघांना अटक, घरफोडीचे ८ गुन्हे उघडकीसजबरी चोर्‍या करणार्‍या दोघांना बेड्या, शिवाजीनगर पोलिसांची कामगिरीचोरीच्या मोबाईलद्वारे १० लाख रुपयांची खंडणी मागणार्‍याला बेड्यापुणे : आंबा महोत्सवाला ग्राहकांचा मोठा प्रतिसादग्रंथालयांच्या अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीललोणावळ्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेपुण्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २८ लाखांवर बनावट नोटा जप्तअनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांनी निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी आवाहनताडी पिण्याच्या दुकानातील वाद जेष्ठाच्या जीवावर बेतला…

भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, गुलटेकडी परिसरातील अपघात

गुलटेकडी येथे टेम्पोची धडक, पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

marathinews24.com

पुणे – भरधाव टेम्पाे चालकाने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुलटेकडी परिसरात घडली. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यल्लप्पा अर्जुन पोटे (वय ४२, रा. गंगाराम स्वीटसशेजारी, डायस प्लाॅट, गुलटेकडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलगा सुमीत पोटे (वय १९) याने याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दागिने घडविणाऱ्या कारागिराला लुटले, पुण्यातील रविवार पेठेतील घटना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटे आणि त्यांचा मुलगा सुमीत शनिवारी (२६ एप्रिल) रात्री साडेनऊच्या सुमारास जेवणाचा डबा आणण्यासाठी गुलटेकडीतील डायस प्लाॅट चौकातून निघाले होते. त्यावेळी शंकरराव डहाणे मार्गावर पोटे थांबले. सार्वजनिक स्वच्छतागृहात जाऊन येतो, असे त्यांनी मुलगा सुमीतला सांगितले. पोटे रस्ता ओलांडून स्वच्छतागृहात निघाले होते. त्यावेळी भरधाव टेम्पोने रस्ता ओलांडणारे पोटे यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता टेम्पोचालक पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पसार झालेल्या टेम्पोचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक आल्हाटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top