Breking News
पुण्यात लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षीय चिमुरडा ठारराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्तीनॉर्वे दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिष्टमंडळात ‘ग्रीनएक्स’च्या आरती भोसले-अहिवळे यांची निवडआरएमसी दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी बीएआय-आरएमसी यांच्यात संयुक्त बैठकपुणे विभागाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्नमुंढव्यातील तो खून नव्‍हे अपघातबनावट सोने तारण ठेवून बँकेची ४ कोटींची फसवणूककाेथरूड भागात तरुणावर शस्त्राने वारमतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांची बैठक संपन्न‘एपीके’ फाईल पाठवून ५० हजारांची फसवणूक

‘एपीके’ फाईल पाठवून ५० हजारांची फसवणूक

सीबीआय अन पोलिसांच्या नावाखाली तोतयांचा डाव

उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मोबाईलवर अज्ञात लिंक किंवा ‘एपीके’ फाईल पाठवून त्याद्वारे मोबाईलचा ताबा मिळवत एका तरुणाची ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी गणेश हनुमंत काकडे (वय ३१, रा. कुडजे) याने फिर्याद दिली असून, अज्ञात मोबाईल धारक आणि बँक खातेधारकांविरुद्ध उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दि. २४ एप्रिलला सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणी पुण्यात संताप; छावा संघटनेचे आंदोलन – सविस्तर बातमी

आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलवर एक ‘एपीके’ फाईल पाठवली. फिर्यादीने ती फाईल उघडताच आरोपीने त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवला आणि खात्यातून ५० हजार रुपये परस्पर वळवून घेतले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस या ऑनलाईन चोराचा शोध घेत आहेत.

स्वस्त दरात ‘हज’ यात्रेचे आमिष, २१ लाखांचा गंडा

हज यात्रा स्वस्त दरात करून देण्याच्या बहाण्याने ७० ते ८० गुंतवणूकदारांची २१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शेहजाद मोहम्मद इस्लाम शेख (वय ३४, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली असून, अमीर सरदार शेख (वय ३८), मिस्बा अमीर शेख (वय ३५) आणि रसाबीर रियाज शेख (वय ३८) यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी ‘अलखली फाटुर्स अँड ट्रॅव्हल्स’ या कंपनीच्या माध्यमातून स्वस्त दरात हज आणि उमरा यात्रेच्या जाहिराती केल्या होत्या. दि. १९ मार्च २०२६ ते १५ मे २०२६ दरम्यान आरोपींनी ७० ते ८० लोकांकडून यात्रेसाठी आगाऊ रक्कम जमा केली. मात्र, प्रत्यक्षात यात्रा न घडवता किंवा पैसे परत न करता २१ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×