Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

बाह्यवळण मार्गावर अपघातात महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर वडगाव पूल परिसरात झाला अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर वडगाव पूल परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध नऱ्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महेश गजानन मानकर (वय २१) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा मित्र सर्वेश गजानन शेळके (वय २०, मूळ रा. रेणुकानगर, डाबकी रस्ता, अकोला) याने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आई रागावल्याने पाच भावंडे घरातून पळाली – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश आणि त्याचा मित्र सर्वेश हे एका शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत. शुक्रवारी (२३ मे) मध्यरात्री एकच्या सुमारास दुचाकीस्वार महेश हा मुंबई-बेंगळुरु बाह्यवळण मार्गावरुन निघाला होता. त्या वेळी वडगाव पूल परिसरात शौर्यश्री लाॅनसमोर भरधाव वाहनाने दुचाकीस्वार महेश याला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहन चालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या महेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

वाघोलीत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुणे- भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाची ओळख पटलेली नाही. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे वय अंदाजे ६० वर्ष आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलीस शिपाई प्रवीण केदार यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरातून गुरुवारी (२१ मे) रात्री साडेआठच्या समुारास ज्येष्ठ नागरिक निघाला होता. रस्ता ओलांडत असताना दुचाकीने त्यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघू तपास करत आहेत. अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली, लोणीकंद, केसनंद फाटा परिसरात अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. हा रस्ता गजबजलेला आहे. रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी मृत्युमुखी पडण्याच्या घटना या भागात नेहमी घडतात.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×