Breking News
पुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडले

मनीषा हवालदार यांना प्रवासी कोठडी

मनीषा हवालदार यांना प्रवासी कोठडी

दिल्लीतील सीबीआय कार्यालयात चौकशी

marathinews24.com

पुणे -‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) अटक करण्यात आलेल्या शिक्षिका मनीषा हवालदार यांना बुधवारी रात्री उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायालयाने हवालदार यांना प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) दिली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची दिल्लीतील ‘सीबीआय’ कार्यालयात चौकशी करण्यात येणार आहे.

पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर – सविस्तर बातमी 

मनीषा संजय हवालदार बुधवार पेठेतील शेठ हिरालाल सराफ प्रशालेत भौतिकशास्त्राच्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. त्या परीक्षा प्रक्रियेशी (राष्ट्रीय चाचणी संचलन संस्था – एनटीए) संबंधित असून, त्यांनी भौतिकशास्त्राचे प्रश्न फोडले, असा आरोप आहे.

‘नीट’च्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेची त्यांना माहिती होती. पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या माॅडर्न महाविद्यालयातील शिक्षिका मनीषा मांढरे यांना त्यांनी ‘नीट’ परीक्षेतील भौतिकशास्त्राचे काही प्रश्न एप्रिल महिन्यात दिले होते. त्यांनी दिलेले प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत आले होते. तपासात याबाबतची माहिती मिळाल्यानंतर हवालदार यांना अटक करण्यात आली. हवालदार यांना बुधवारी (२२ मे) रात्री साडेअकराच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी त्यांना दिल्लीतील ‘सीबीआय’ कार्यालयात नेण्यासाठी प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) देण्यात यावी, अशी विनंती ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केली. ती न्यायालयाने मान्य केली.

हवालदार यांनी प्रश्नपत्रिका जाळल्या?

हवालदार यांनी भौतिकशास्त्राचे प्रश्न माॅडर्न महाविद्यालयातील शिक्षिका मनीषा मांढरे यांना दिले होते. त्याबदल्यात त्यांनी रोख रक्कम स्वीकारली होती. ‘नीट’शी संबंधित प्रश्न त्यांनी कागदांवर लिहून ठेवले होते. संबंधित प्रश्न त्यांनी समाज माध्यमातून पाठविले होते. ‘सीबीआय’च्या पथकाने हवालदार यांच्या घराची झडती घेतली, तेव्हा काही कागदपत्रे हवालदार यांनी जाळून टाकल्याची माहिती मिळाली. त्या दृष्टीने ‘सीबीआय’कडून हवालदार यांची चौकशी करण्यात येणार आहे.

मोटेगावकरचा वारज्यात कोट्यवधींचा भूखंड

पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेला ‘आरसीसी’ या शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याने पुण्यातील वारजे भागात ५१ गुंठे जमीन खरेदी केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. ही जमीन मोक्याच्या ठिकाणी आहे. २०२३ मध्ये मोटेगावकर याने ही खरेदी केली. या जमिनीचे बाजारमूल्य ३५ ते ४० कोटी रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×