Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर

जुन्या वादातून तरुणावर हत्याराने जीवघेणा हल्ला

चारित्र्याचा संशयावरुन खून केल्याचे उघड

marathinews24.com

पुणे – चारित्र्याच्या संशयावरुन महिलेच्या डोक्यात रिकामा सिलिंडर घालून खून करण्यात आल्याची घटना कोंढव्यातील येवलेवाडी भागात घडली. महिलेचा खून करुन आरोपी पती येवलेवाडी पोलीस ठाण्यात हजर झाला असून, पोलिसांनी रात्री उशीरा त्याला अटक केली.
गीता जाधव (वय २६, सध्या रा. येवलेवाडी, मूळ रा. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती राजेंद्र जनार्दन कर्चे (वय ३२, मूळ रा. पिंपरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र हा येवलेवाडीतील एका गृहप्रकल्पात रंगकाम करतो. गीताचा विवाह झाला होता. ती पतीपासून विभक्त झाली असून, गेल्या वर्षी डिसेेबर महिन्यात गीता आणि राजेंद्र यांनी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत घरी विवाह केला होता. दोघे जण येवलेवाडीतील गृहप्रकल्पाच्या आवारात राहत होते. गेल्या काही दिवसांपासून तो पत्नी गीताच्या चारित्र्याचा संशय घेत होता. शुक्रवारी (२२ मे) त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर शनिवारी पहाटे त्याने गीताच्या डोक्यात सिलिंडर घालून खून केला. खून केल्यानंतर त्याने बाहेरून खोलीचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर तो पसार झाला.

राजेंद्र हा पसार होण्याच्या तयारीत होता. दिवसभर तो येवलेवाडी भागात फिरला. त्यानंतर शनिवारी (२३ मे) सायंकाळी सहाच्या सुमारास येवलेवाडी पोलीस ठाण्यात हजर झाला. पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा गीता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. ‘प्राथमिक तपासात आरोपीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×