Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

- पोलीस, डाॅक्टरांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा

लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील येरवड्यात रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला महागात पडले. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी माजी नगरसेवक, तसेच त्यांच्या मुलासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

डेटिंग ॲपवरील ओळख महागात;उद्योजकाची ७ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी

या प्रकरणी माजी नगरसेवक किशाेर राजाराम विटकर (वय ५१), हर्षद किशोर विटकर (वय २८), गणेश पोपटराव ढोकळे (वय ४०), गणपत जिवराज पुरोहित (वय ५१), विकास मच्छिंद्र सोनवणे (वय ४०), रोहित मधुकर वैराळ (वय ३५, सर्व रा. येरवडा), रामेश्वर अरुण दुर्लेकर (वय ३२, रा. वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस कर्मचारी बलजीत थोरात यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किशोर विटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, येरवड्यातील गाडीतळ परिसरात विटकर यांचे कार्यालय आहे. शुक्रवारी (२२ मे) कार्यालयासमोरील रस्त्यावर टेबल टाकून केक कापण्यात आला. विटकर यांच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री एकच्या सुमारास आतषबाजी करण्यात आली. विटकर आाणि त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक शांततेता भंग केला, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे पोलिसंनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×