Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

डेटिंग ॲपवरील ओळख महागात; उद्योजकाची ७ कोटींची फसवणूक

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली

चोरट्यांविरुद्ध माहिती -तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – डेटिंग ॲपवर मैत्रीचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांनी कोंढवा भागातील एका उद्योजकाची तब्बल सात कोटी ७ कोटी ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध माहिती -तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वयंसेवी संस्थेतील लिपिकाकडून शिष्यवृत्तीचा अपहार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५३ वर्षीय व्यावसायिक अविवाहित असून, ते काेंढवा भागात राहायला आहेत. तक्रारदार व्यावसायिकाचा भोसरीतील औद्योगिक वसाहतीत वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचा कारखाना आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांची डेटिंग ॲपवरुन त्यांची एका महिलेशी ओळख झाली होती. महिलेशी त्यांची ओळख वाढली. त्यानंतर महिलेने त्यांना जाळ्यात ओढले. परकीय चलन व्यवहारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, अशी बतावणी महिलेने केली.

त्यानंतर महिलेने त्यांना व्यवहार करण्यासाठी खाते उघडण्यास सांगितले. एका ॲपच्या माध्यमातून त्यांनी खाते सुरू केले. त्यानंतर महिलेने विविध बँक खात्यात त्यांना गुुंतवणुकीसाठी पैसे भरण्यास सांगितले. गेल्या दीड वर्षात उद्योजकाने वेगवेगळ्या बँक खात्यात ७ कोटी ७ लाख ६१ हजार रुपये जमा केले. रक्कम जमा केल्यानंतर एका ॲपवर त्यंना परतावा जमा झाल्याचे दिसून आले होते. परताव्याची रक्कम काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, परताव्याची रक्कम परत काढता आली नाही. फस‌वणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×