Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

केज तालुक्यात वादळीवाऱ्यासह पावसाचा हाहाकार, झाड कोसळून एकाचा मृत्यू

फळबागा उद्ध्वस्त वीज यंत्रणा कोलमडल्याने अनेक गावे अंधारात

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – केज तालुक्यातील मस्साजोग, युसुफ वडगाव महसूल मंडळ आणि अन्य महसूल मंडळाच्या परिसरात शनिवारी (दि.२१) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या तीव्र चक्रीवादळसदृश वाऱ्याने आणि अवकाळी पावसाने मोठा हाहाकार माजवला आहे. ताशी १०० ते १२५ किलोमीटरच्या प्रचंड वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मस्साजोग, आरंणगाव, कोरेगाव, बेलगाव, केळगाव, काळे गाव, सावंतवाडी, धनेगाव, नायगाव, सादोळा, भालगाव, बावची, सोनिजवळा युसुफवडगाव परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.

शंकरशेठ रोडवर मेफेड्रॉनसह आरोपी जेरबंद; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त – सविस्तर बातमी

मुख्य रस्त्यांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडल्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या केळीच्या बागा आणि इतर फळबागा जमिनीदोस्त झाल्या असून नागरिकांच्या घरांवरील पत्रे तसेच घरगुती व कृषी सोलर पॅनेल्स हवेत उडून गेले आहेत. काही ठिकाणी घरांच्या भिती कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या असून, केज तालुक्यातील सोनीजवळा येथील दिगांबर भीमराव ससाने हे सायंकाळच्या सुमारास वादळी पाऊस आल्याने आंब्याच्या झाडाखाली थांबले असता आंब्याच्या झाडावर बीज कोसळून आंब्याचे झाड मुळासकट उपटून त्यांच्या अंगावर पडल्याने झाडाखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. या वादळाचा सर्वांत मोठा फटका परिसरातील सार्वजनिक बीज पुरवठा यंत्रणेला बसला असून संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. उच्चदाब वीजवाहिन्यांचे खांब आणि तारा जागोजागी तुटून पडल्यामुळे या भागातील दोन महत्त्वाची वीज उपकेंद्रे पूर्णपणे बंद पडली आहेत.

रस्त्यांबर पडलेल्या झाडांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी तात्काळ प्रशासकीय यंत्रणेला गतिमान केले असून त्यांनी स्वतः या संपूर्ण बचाव आणि मदतकार्यावर बारीक लक्ष ठेवले आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी केजचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना तातडीने बाधित गावांचा दौरा करून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच आज सकाळीच संबंधित सर्व विभागांनी घटनास्थळी दाखल होऊन शेती पिके, फळबागा, घरे आणि बीज यंत्रणेच्या झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे सुरू करावेत, अशा कडक सूचना त्यांनी दिल्या आहेत. वादळग्रस्त नागरिकांना आणि शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित आणि जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून प्रशासनाने यात कोणताही हलगर्जीपणा करू नये, असे आदेश आमदार नमिता मुंदडा यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आमदार मुंदडांकडून अधिकाऱ्यांना पंचनाम्याच्या सूचना

गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच आमदार नमिता मुंदडा यांनी कसलाही विलंब न लावता तातडीने पावले उचलली. त्यांनी स्वतः या संपूर्ण बचावकार्यावर बारीक लक्ष ठेवले असून प्रशासनाला खालीलप्रमाणे कडक निर्देश दिले आहेत. आमदार यांनी तहसीलदार अशोक भंडारे, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांना तातडीने तात्काळ बाधित गावांचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.दि.२४ रविवार पासूनच संबंधित सर्व विभागांनी घटनास्थळी दाखल होऊन शेती पिके, फळबागा, घरे आणि वीज यंत्रणेच्या झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे सुरू करावेत, अशा कडक सूचना आमदारांनी दिल्या आहेत. मदत मिळवून देण्यासाठी वादळग्रस्त नागरिकांना आणि शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित आणि जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. यात प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा करू नये, असा सज्जड दम आमदार मुंदडा यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. शेतकरी आणि नागरिकांवर आलेले हे अस्मानी संकट मोठे आहे. मी स्वतः संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. प्रशासनाला युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, बाधितांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून दिल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असे आमदार मुंदडा यांनी म्हटले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×