Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

मेफेड्रोन विक्री प्रकरणात एक जण अटकेत

शंकरशेठ रस्त्यावर कारवाई

marathinews24.com

पुणे – मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शंकरशेठ रस्ता परिसरातून अटक केली. त्याच्याकडून मोटार, मोबाइल, मेफेड्रोन असा एक लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कानिफनाथ उर्फ कानू विष्णू नायडू (वय ५१, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

फ्लॅटमधून पाच लाखांचा ऐवज लांबविला – सविस्तर बातमी

शंकरशेठ रस्ता परिसरात २२ मे रोजी अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी गस्त घालत होते. त्या वेळी उड्डाणपुलाजवळ आरोपी नायडू हा मोटारीतून आला होता. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून एक लाक ४५ हजार ८०० रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. या प्रकरणात गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींनी नायडू याला मेफेड्रोन विक्रीसाठी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडून दोघांचा शोध घेण्यात येत आहे. नायडू याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×