सिंहगड रोड परिसरात घडली घटना
marathinews24.com
पुणे – मोबाइल हॅक करून सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलचा ताबा घेतला. त्यानंतर बँकखात्याचा अॅक्सेस घेउन खात्यातून ४६ हजार रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली. त्यांच्या नावावर क्रेडीट कार्ड पाठवून त्याद्वारे सव्वा पाच लाख रूपयांचे व्यवहार करीत मिळून ५ लाख ७१ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ३० डिसेंबर २०२५ ते २ मार्च २०२६ कालावधीत सिंहगड रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मोटारीची काच फोडून ऐवजाची चोरी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सिंहगड रोड परिसरात राहायला असून, ३० डिसेंबरला सायबर चोरट्यांनी महिलेचा मोबाइल हॅक केला. त्यांच्या बँकखात्याचा ताबा घेउन ऑनलाईनरित्या ४६ हजार रूपये वर्ग करून घेतले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेच्या नावावर क्रेडीट कार्ड पाठवून दिले. मात्र, महिलेला क्रेडीट कार्ड मिळण्याआधीच सायबर चोरट्यांनी त्याद्वारे तब्बल सव्वा पाच लाख रूपयांचे व्यवहार केले. तब्बल पावणेसहा लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करीत आहेत.





















