सोसायटीच्या आवारात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

सोलापूर रस्त्यावर पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्य आवारात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरट्याकडून ज्येष्ठाची ५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४० वर्षीय महिला भारती विद्यापीठ परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. शनिवारी (३० मे) दुपारी तीनच्या सुमारास त्या सोसायटीच्या आवारातून निघाल्या होत्या. त्या वेळी सोसायटीच्या आवारात एक चोरटा शिरला. सोसायटीच्या आवारात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने आरडाओरडा केला. त्यानंतर चोरटा दुचाकीवरुन पसार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चाेरट्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×