Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

सायबर चोरट्याकडून ज्येष्ठाची ५ लाखांची फसवणूक

पाॅलिसीची रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक

सायबर चोरट्याविरुद्ध बाणेर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाची पाच लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध बाणेर पोलिसांनी गु्न्हा दाखल केला.याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.

प्रियकराकडून तरुणीची १८ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिक बाणेर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर फेब्रुवारी महिन्यात संपर्क साधला. एका खासगी बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुर्विमा पाॅलिसी सुरू करण्यात आली. या पाॅलिसीत पैसे गुंतविल्यास फायदा होईल, असे आमिष चोरट्याने त्यांना दाखविले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने चोरट्याने सांगितलेल्या बँक खात्यात वेळावेळी पाच लाख ३७ हजार रुपये जमा केले. रक्कम गुंतविल्यानंतर परतावा देण्यात येईल, असे चोरट्याने त्यांना सांगितले होते. परताव्याबाबत ज्येष्ठाने चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्कसाधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद होता. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खिलारे तपास करत आहेत.

ज्येष्ठाच्या बँक खात्यातून रोकड लंपास

ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल संच चोरून चोरट्याने खात्यातून एक लाख ९८ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्यााची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे लोणी काळभोर भागात राहायला आहेत. तक्रारदार हे २२ मे रोजी लोणी काळभोमधील नायगाव फाटा येथे मोटारीतून गेले होते. त्यांनी मोटार रस्त्याच्या कडेला लावली होती. चोरट्यांनी मोटारीतील मोबाइल चोरला. ज्येष्ठाचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला आहे. चोरट्यांनी मोबाइलमधील माहितीचा गैरवापर करुन ज्येष्ठाच्या बँक खात्यातून एक लाख ९८ हजार रुपये काढून घेतले. खात्यातून रोकड चोरीला गेल्याचा प्रकारु उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद पन्हाळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×