Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

प्रियकराकडून तरुणीची १८ लाखांची फसवणूक

पेट्रोल पंपात भागीदारीच्या आमिषाने २ कोटी २९ लाखांची फसवणूक

पैसे मागितल्यानंतर तरुणीला धमकी

marathinews24.com

पुणे – विवाह न करता एकत्र राहणाऱ्या प्रियकराने तरुणीला व्यवसायासाठी १८ लाख रुपयांचे कर्ज काढण्यास सांगून तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. तरुणीने पैसे मागितल्यानंतर प्रियकराने तिची छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मूळचा जळगावमधील आहे. या प्रकरणी रोहित अतुल पाटील (वय ३१, रा. श्रीरामनगर, चोपडा, जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जागे व्हा, पुणे पोलिसांनो जागे व्हा – सविस्तर बातमी

फिर्यादी तरुणी आणि आरोपीची दहा वर्षांपूर्वी जळगावमधील एका महाविद्यालयात ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर तरुणी पुण्यात शिक्षणासाठी आली. आरोपी पुण्यात आला. तरुण आणि तरुणी पुण्यात एकत्र राहू लागले. दुसऱ्या एका तरुणासोबत मैत्री असल्याचे सांगून आरोपीने तरुणीला मारहाण केली. त्यानंतर तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले. आरोपी गावी निघून गेला. त्यानंतर तिने २०२३ मध्ये विवाह केला. विवाहानंतर त्याने तरुणीला पैसे मागण्यास सुरुवात केली. पैसे नाही दिले तर पतीला छायाचित्रे पाठवेल, अशी धमकी त्याने तिला दिली. तरुणीचा पतीशी वाद झाल्यानंतर तिने घटस्फोट घेतला.

फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपी पुन्हा पुण्यात आला. मुंढव्यातील केशवनगर भागात तो तरुणीसोबत एकत्र राहू लागला. बिअर शाॅपी सुरू करायची आहे, असे त्याने तिला सांगितले. तरुणीला दोन बँकांकडून कर्ज काढण्यास सांगितले. तरुणीने दोन बँकाकडून १८ लाख रुपये कर्ज घेतले. जुलै ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत त्याने बँकेचे हप्ते भरले. त्यानंतर त्याने हप्ते भरण्यास नकार दिला. तरुणीने त्याच्याकडे विचारणा केली. आरोपी जळगावला निघून गेला. तरुणीची सोन्याची अंगठी त्याने गहाण ठेवली होती. तरुणीची छायाचित्रे आणि चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली. आरोपीच्या त्रासामुळे तरुणीने नुकतीच मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक कवीराज पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×