दारू विक्री प्रकरणात एकाला अटक
marathinews24.com
पुणे – जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी परिसरात गावठी दारू अड्ड्यावर शिरुर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत ५०० लिटर रसायन, २०० लिटर गावठी दारू, मोटार असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
विवाहाच्या आमिषाने फसवणूक; युवतीची आत्महत्या – सविस्तर बातमी
निलेश गुलाब लोंढे (वय ३४, रा. शेळके वस्ती, निमगाव भोगी, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध शिरुर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमगाव भोगी गावातील शेळके वस्तीत लोंढे हा गावठी दारू विक्रीचा अड्डा चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर २९ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेथून गावठी दारू, दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन, अन्य साहित्य जप्त करण्यात आले.। कारवाईत ५०० लिटर रसायन, २०० लिटर गावठी दारू, मोटार असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी आरोपीविरुद्ध गावठी दारू विक्री प्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक महादेव वाघमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीळकंठ तिडके, विलास आंबेकर, संतोष ओैटी, उमेश कुतवळ, योगेश गुंड, विद्या बनकर, किशोर शिवणकर, अमोल रासकर, अजित पवार, ज्ञानेश्वर शिंदे यांनी ही कारवाई केली. उपनिरीक्षक थोरात तपास करत आहेत.






















