आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – प्रेमप्रकरणातून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना वारजे माळवाडी भागात घडली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत तरुणीच्या आईने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राज ठोंबरे (वय २३, रा. कोथरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबर चोरट्यांकडून डाॅक्टरांची ४६ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी भागात २१ वर्षीय तरुणी राहत होती. आरोपी तरुणाशी तिचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपीने दुसऱ्या एका तरुणीशी मैत्री केली होती. तेव्हापासून तो तरुणीला टाळत होता. तरुणीने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने तिच्याशी भांडणे करुन मानसिक त्रास दिला. त्याच्या त्रासामुळे तरुणीने ४ मे रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भांबेरे करत आहेत.
सहकारनगर भागातील एका अल्पवयीन युवतीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहाचे आमिष दाखविले होते. विवाहास नकार दिल्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.





















