Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

सायबर चोरट्यांकडून डाॅक्टरांची ४६ लाखांची फसवणूक

ओएलएक्सवर टेबल खरेदी करणे पडले पावणेपाच लाखाला

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ डाॅक्टरांची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ८७ वर्षीय डाॅक्टरांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डाॅक्टर हे डेक्कन जिमखाना भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी गेल्या महिन्यात २४ मे रोजी तक्रारदार डाॅक्टरांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. मुंबई पोलिसांनी तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे, अशी भीती सायबर चोरट्यांनी त्यांना दाखविली. त्यानंतर या प्रकरणात अटक करण्यात येणार आहे. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील. त्यानंतर घाबरलेल्या डाॅक्टरांनी चोरट्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यात ४६ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर चोरट्यांनी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

बँक अधिकारी असल्याची बतावणी करुन फसवणूक

बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची चार लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे बाणेर परिसरात राहायला आहेत. रविवारी (३१ मे) सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. बँकेतून अधिकारी बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. बँक खात्याची माहिती अद्ययावत करायची आहे, असे सांगून चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविली. ही लिंक उघडल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून चार लाख दहा हजार रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खिलारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×