Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखविल्याने तरुणाची आत्महत्या

गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखविल्याने तरुणाची आत्महत्या

खराडी भागातील घटना

marathinews24.com

पुणे – विवाह न करता एकत्र राहणाऱ्या (लिव्ह इन रिलेशन) तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. खराडी भागात नुकतीच ही घटना घडली. करण बाळासाहेब कांबळे (वय २८, मूळ रा. खरबा, मानावत, जि. परभणी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

ब्राऊन शुगरची विक्री प्रकरणात दोघे अटकेत – सविस्तर बातमी 

याप्रकरणी प्रीती अनिकेत बोढर्डे उर्फ रमिसा उर्फ माही, उर्फ प्रीती सुधीर रणदिवे (वय ३१, रा. थिटे वस्ती, खराडी), अनिकेत बोढर्डे (वय ४१, रा. जेघेनगर, बिबवेवाडी), संस्कृती सुधीर रणदिवे (वय २५), ऋतीक सुधीर रणदिवे (वय २६, दोघी रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत करण याचा भाऊ कृष्णा (वय ३४, सध्या रा. थिटे वस्ती, खराडी) याने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रीती आणि करण यांच्यात ओळख झाली होती. प्रीतीचे दोन विवाह झाले आहेत. पतीशी न पटल्याने ती वेगळी राहत होती. प्रीतीची करण याच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघे जण खराडीतील थिटे वस्ती परिसरात राहण्यास आले. त्यानंतर प्रीतीचा पहिला पती अनिकेत बोढर्डे, तिची बहीण संस्कृती भाऊ ऋतीक यांनी करणला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखविली. आरोपींच्या धमकीमुळे करण नैराश्यात होत्या. आरोपींच्या त्रासामुळे करण याने १ जून रोजी खराडीतील राहत्य घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे करणचा भाऊ कृष्णा कांबळे याने फिर्यादीत म्हटले आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×