Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

कोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्या

पोलिसांकडे तक्रारीची धमकी दिल्याने तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – लग्नात हुंडा न दिल्यामुळे महिलेचा छळ करीत तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची घटना ३१ मे रोजी कोंढवा खुर्दमधील साईबाबा नगर घडली आहे. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून, इतरांविरूद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिसबा ऐजाज कुरेशी ताडे (वय २१, रा. जमजम टॉवर, कोंढवा खुर्द) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती ऐजाज कुरेशी ताडे (वय २८) याला अटक केली आहे. हमीदा कुरेशी ताडे, नौशीन कुरेशी ताडे, फिजा (पुर्ण नाव नाही) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐजाज आणि मिसबाचे २०२४ लग्न झाले होते. लग्नांतर हुंडा न दिल्यामुळे आरोपींनी मिसबाचा छळ सुरू केला. दोन वर्ष छळामुळे मानसिक त्रासाला कंटाळून मिसबाने ३१ मे रोजी गळफास घेउन आत्महत्या केली. दरम्यान, पैशांसाठी आरोपींनी मुलीचा छळ केला. तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची फिर्याद आईने दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे तपास करीत आहेत.

खराडीत सव्वा लाखांचे दोन लॅपटॉप चोरीला

घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी २ लॅपटॉप चोरून नेल्याची घटना १ जूनला रात्री साडेबारा ते सकाळी सातच्या सुमारास खराडीतील झोलो लायलॅक पीजीमध्ये घडली आहे. याप्रकरणी ३० वर्षीय तरूणाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खराडीतील झोलो लायलॅक पीजीमध्ये राहायला असून, १ मे रोजी मध्यरात्री त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. १ लाख २५ हजारांचे दोन लॅपटॉप चोरून नेले. दुसर्‍या दिवशी सकाळी तक्रारदाराला लॅपटॉप चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलीस अमलदार तारू तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×