Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीला

महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीला

लोणीकंद पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरून नेण्यात आल्याची घटना घडली. मांजरी, तसेच लोणीकंद परिसरात या घटना घडल्या. या प्रकरणी वाघोली, तसेच लोणीकंद पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मांजरी भागातील सोमनाथ पोल्ट्री फार्मजवळ असलेल्या रोहित्राची तोडफोड करुन ५८० किलो तांब्याची तार चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत महावितरणचे कर्मचारी कैलास ताम्हाणे (वय ३६) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरीतील सोमनाथ पोल्ट्री फार्मजवळ महावितरणचे रोहित्र आहे. चोरट्यांनी ३० मे रोजी मध्यरात्री रोहित्राची तोडफोड केली. रोहित्रातील ५८० किलो तांब्याची तार चोरुन नेली. चोरलेल्या तांब्याच्या तारांची किंमत ७५ हजार रुपये आहे. तोडफोडीत रोहित्राचे नुकसान झाले. मंगळवारी (२ जून) हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस हवालदार विठ्ठल घुले तपास करत आहेत.

पुणे- अहिल्यानगर रस्त्यावर लोणीकंद भागात असलेल्या हिंगणगावातील रोहित्राची तोडफोड करुन चोरट्यांनी ३२० किलो तांब्याची तार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. महावितरणचे कर्मचारी बालाजी मुरकुटे (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणगावातील मुळ-मुठा नदीकिनारी महावितरणचे रोहित्र आहे. चोरट्यांनी रोहित्राची तोडफोड केली. तोडफोडीत रोहित्रातील ८४० लिटर ऑईल सांडले. चोरट्यांनी रोहित्रातील तांब्याची तार चोरुन नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पाेलीस हवालदार साळुंके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×