Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

हुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्या

वडिलांना मारहाण केल्याने तरुणाचा केला खून

२० वर्षीय तरुणीने किटकनाशक पिऊन केली आत्महत्या

marathinews24.com

पुणे – प्रेमविवाह केल्यानंतर हुंड्यासाठी छळ केल्याने २० वर्षीय तरुणीने किटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पतीसह सासू, नणंदेविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत तरुणीच्या आईने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती अजित दशरथ पवार (वय २५), सासू अनुसया दशरथ पवार (वय ५५), नणंद अलका लहू जाधव (वय ३०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती मूळचा लातूरमधील आहे. तो सध्या पुण्यात राहायला आहे. फिर्यादी महिलेच्या मुलीने वर्षभरापूर्वी आरोपी तरुणाशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर पती, सासू, नणंदेने तरुणीचा हुंड्यसाठी छळ सुरू केला. माहेरहून दागिने घेऊन येण्याची मागणी त्यांनी केली. छळ असह्य झाल्याने तरुणीने किटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. मुलीचा हुंड्यासाठी छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद आईने दिल. पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे तपास करत आहेत.

तुळशीबागेत ज्येष्ठ महिलेची फसवणूक

स्वस्तात सोन्याचे मणी देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेकेडील सोन्याचे दागिने आणि रोकड असा ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आल्याची घटना तुळशीबागेत घडली. याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला धनकवडीतील मोहननगर भागात राहायला आहेत. मंगळवारी (२ जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास ज्येष्ठ महिला तुळशीबागेतून निघाल्या होत्या. त्या वेळी दोन महिलांनी त्यांना अडवले. स्वस्तात सोन्याचे मणी देेण्याचे आमिष त्यांना दाखविले. त्यानंतर दोघींनी ज्येष्ठ महिलेला बोलण्यात गुंतविले. ज्येष्ठ महिलेकडील सोन्याचे मणी आणि रोकड असा ५० हजार ६१० रुपयांचा ऐवज चोरून महिला पसार झाल्या. दागिने आणि रोकड चोरल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.
पसार झालेल्या महिलांचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांनी तुळशीबागेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस हवालदार खरात तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून तुळशीबागेत खरेदीसाठी येणाऱ्या महिलांच्या पिशवीतून दागिने, रोकड चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×