दोषसिद्धीसाठी पाठपुरावा करणार – डॉ. नीलम गोऱ्हे
marathinews24.com
पुणे – गर्भलिंग निदानाच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी दोषींवरील कारवाईबरोबरच न्यायालयीन प्रक्रियेत दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे मत शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा २८ नुसार सिव्हिल सर्जन यांना अंमलबजावणीसाठी प्राघिकृत केले आहे , परंतु कायद्याची नियमावली करून कार्यवाही वेगाने व काटेकोरपणे ह्वावी साठी नियमावली आवश्यक असल्याचे नीलम गोर्हेंनी सुचविले त्याला आरोग्य विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला. दिर्घकाळ चाललेल्या केसेस व त्यातुन मिळणारे जामिन परिणामी तेच ते आरोपी संघटित होत आहेत यावर तोडगा म्हणुन प्रतिबंधात्मक कारवाई व कायदेशीर रित्या तपासुन परत परत तेच गुन्हे करणाऱ्या आरोपींवर कटकारस्थान व मोक्का चा विचार करावा यावर एकमत झाले.
पुणे पोलिसांना जाग, ९ महिन्यांनी गुंड सचिन घायवळला अटक – सविस्तर बातमी
पुणे जिल्ह्यातील अलीकडील प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दूरध्वनीद्वारे दिले. गर्भलिंग निदान प्रकरणांमधील आरोपींना शिक्षा झाल्यास अशा बेकायदेशीर प्रकारांना मोठा प्रतिबंध बसेल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
गर्भलिंग निदानाच्या घटनांमागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी आशा व अंगणवाडी सेविकांची विशेष पथके तयार करण्याबरोबरच त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. तसेच रुग्णवाहतूक करणारे रिक्षा व ट्रक चालक यांनाही जनजागृती मोहिमेत सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव डॉ. गोऱ्हे यांनी मांडला.
सीमावर्ती व आंतरजिल्हा भागांमध्ये अशा घटनांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास येत असल्याने जी विविध विभागातीस संबंधित गुन्हेगारी साखळीला प्रतिबंध करण्यास आरोग्य व पोलीस विभागाने एकत्र काम करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. जुन्या प्रकरणांतील फरार आरोपींवर पोलिसांनी सातत्याने लक्ष ठेवावे, अशी मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली.
बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ एम्पल्ले, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाढ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, पोलीस उपअधीक्षक बापूराव धडस, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आदी अधिकारी उपस्थित होते. २०१७ मधील दौंड तालुक्यातील बिरोबावाडी गर्भलिंग निदान प्रकरणाचाही विशेष आढावा यावेळी घेण्यात आला.






















