Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

पुणे पोलिसांना जाग, ९ महिन्यांनी गुंड सचिन घायवळला अटक

कुख्यात गुंड नीलेश घायवळ अजूनही पसारच

marathinews24.com

पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीत कुख्यात गुंडाला अटक केली आहे. गुन्हे शाखेने तब्बल ९ महिन्यांची कुख्यात गुंड नीलेश घायवळचा भाउ गुंड सचिन बन्सीलाल घायवळ याला राजस्थानमधून अटक केली आहे. किरकोळ वादातून दोघा तरूणांवर कोयत्याने वार करून घायवळ टोळीने १७ सप्टेंबर २०२५ रोजी कोथरूडमध्ये दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचे आदेश निघताच घायवळ बंधूनी पलायन केले होते. अखेर राजस्थानमधून सचिन घायवळला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, गुंड नीलेश घायवळ अजूनही पसार असून, त्याच्या शोधासाठी पोलीस अजूनही शांत आहेत.

सोसायटीच्या प्रशासकाने केली ३२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

कोथरूडमधील दोन तरुणांवरील हल्याप्रकरणी गुंंड नीलेश घायवळ आणि त्याचा भाउ सचिनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी यापुर्वी सहा आरोपीना अटक केली होती. त्यांच्याविरूद्ध मोक्का कारवाई होताच गुंड सचिन पसार झाला होता.दरम्यान, महिलेकडून ४४ लाखांची खंडणी उकळल्यासह बांधकाम व्यावसायिकाकडून १० फ्लॅट बळकावल्याप्रकरणी सचिनविरूद्ध गुन्हा दाखल आहे. युनीट तीनचे अतुल साठे, नितीन जगदाळे, मारूती पारधी, योगेश झेंडे, शुभम वागसकर हे आरोपीचा शोध घेत होते. त्यावेळी अमलदार साठे यांना गुंड सचिन हा राजस्थानातील सिकर राज्यात असल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली.

मंदीरात सांबार भातचे जेवण, भाडोत्री खोली

पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी गुंड सचिन घायवळ हा सुरूवातीला सोलापूरमधील एका खेड्यात राहत होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये तो राजस्थानमधील धिंगपूर गावात राहायला गेला. त्याठिकाणी देवस्थान असल्यामुळे मोफतचे जेवण मिळत होते. त्याने साडेसहा हजार रूपये महिना देत भाडोत्री खोली घेतली होती. देवस्थानच्या भंडार्‍यात सांबर-भात, दाळबट्टी, रोट-भाजी असे जेवण करीत तो राहत होता. पैशांची बचत व्हावी, जास्तीत जास्त पोलिसांपासून दूर राहता यावे, यासाठी तो मंदीराजवळ भाडोत्री खोलीत राहत होता.

दाढी-मिशा वाढवून साधूचा पेहराव

पोलीस आपल्यापर्यंत पोहचले तरी, कोणालाही ओळखू येउ नये यासाठी त्याने दाढी-केस वाढवले होते. मंदीरात राहून दिवस ढकलणे, कमी कमी पैशांचा वापर करणे, कुटूंबियांसोबत संवाद न साधणे, कोणाचीही संपर्क न ठेवल्यामुळे तो पोलिसांच्या रडारवर आला नाही. मागील ९ महिन्यांपासून तो विविध ठिकाणी फिरल्याचे तपासात उघडकीस आले. मात्र, गुन्हे शाखेच्या युनीट तीनने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, गुंड सचिन हा तब्बल ५ मोक्काच्या गुन्ह्यात फरार होता.

गृहराज्यमंत्र्यांनी केली होती शस्त्र परवान्याची शिफारस

सचिन घायवळ त्याच्यावर २०१० आणि २०१५ मध्ये गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यानंतरही त्याने स्वतःला शस्त्र परवाना मिळावा यासाठी पुणे पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी अर्ज फेटाळल्यानंतर घायवाळ याने गृह मंत्रालयाकडे अर्ज केला. व्यावसायिक कारणांसाठी मला रोख रक्क्म बाळगावी लागते, ती रक्कम मोठी असल्याने बाळगताना माझ्या जीवाला धोका आहे, त्यासाठी शस्त्र परवाना मिळावा यासाठी असा अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळून लावल्याने सचिन घायवळने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यालयाकडे अपील केले होते. संबंधित अपिलावर सुनावणी घेत गृहराज्यमंत्री कदम यांनी पुणे पोलिसांचा आदेश रद्द केला. त्यानंतर सचिनला शस्त्र परवाना देण्याची शिफारस केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×