Breking News
रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारएचआयव्हीग्रस्त मुलांच्या निवाऱ्याच्या नावावर खंडणीश्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक; संस्थानच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारमराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्यपुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीरप्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ पुणेतर्फे (प्रॉप) ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ राष्ट्रीय परिषदेचे ६ जुलैला आयोजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारथी कार्यालयास भेटलष्करी गणवेश शिवण्याच्या बतावणीने टेलरिंग व्यावसायिकाची फसवणूकपुण्यात गणेश पेठेत भरदिवसा घरफोडीनिलेश घायवळ टोळीतील गुंड अटकेत

सोसायटीच्या प्रशासकाने केली ३२ लाखांची फसवणूक

पुण्यात जंगली महाराज रस्त्यावरील बँकेची फसवणूक

अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्या प्रशासकाने पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करत सोसायटीच्या बँक खात्यातून परस्पर ३२ लाख रुपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल रमेश महाजन (वय ५१, धनकवडी) शिवाजी भीमराव राठोड (रा. हडपसर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत मकरंद मांडके (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे.

वाघोलीत १२ लाखांचे हेरॉईन, डोडाचुरा जप्त आरोपीला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर येथील निलकमल सोसयाटीचा अतुल महाजन हा २० मार्च २०२३ ते १९ जानेवारी २०२६ दरम्यान प्रशासक (ऑडिटर) म्हणून काम बघत होता. त्यावेळी शिवाजी राठोड हा त्याच्यासोबत काम करायचा. या कालावधीत या दोघांनी पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करत सोसायटीच्या कॉसमॉस बँकेच्या खात्यातून निलकमल सोसायटीच्या वतीने ठेवण्यात आलेली ३२ लाखांची रोकड काढून घेत अपहार केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीक्षित करत आहेत.

आयटी कंपनीत नोकरीचे आमिष पडले ४४ लाखांना

कंपनीत पैसे भरल्या तुम्हाला चांगल्या आयटी कंपनीत नोकरीला लावतो असे आमिष दाखवत चौघांनी ४३ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून खराडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेडीयंट कंपनी एलएलपी चा मालक सैफ वाहिद मनियार (वय ३१, रा. उरूळीकांचन, तुपे वस्ती), एक्झिक्युटिव्ह मॅनेजर समित सुराना, फायनान्स मॅनेजर वैभव दुबेवार, गितेश कुंबलकर (वय २५, रा. रावेत) यांच्यासह अन्य संचालक मंडळातील लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२५ ते ३० मार्च २०२६ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून तक्रारदार तरूणीसह अन्य मुलांना रेडियंट एडटेक एलएलपी कंपनीमध्ये पैसे भरल्यास पुढे चांगल्या आयटी कंपनीत नोकरीला अथवा कामाला लावतो असे आमिष दाखवले. त्यानंतर या मुलांकडून नोंदणी फॉर्म भरून घेत फिर्यादी तरूणीकडून १ लाख ९० हजार रुपये व अन्य मुलांकडून वेगवेगळी रक्कम असे ४३ लाख ६२ हजार रुपये स्विकारले. यासह या मुलांना ३ महिन्यांचा पगार दिल्यानंतर तो पुढे बंद करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गोडसे करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×