वाघोलीत १२ लाखांचे हेरॉईन, डोडाचुरा जप्त

आरोपीला पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – अमली पदार्थ तस्करी करणार्‍या आरोपीला वाघोली पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल ११ लाख ४० हजारांचे हेरॉईन, डोडाचुरा (गांजा) असे नशेली पदार्थ जप्त केले आहेत. शिव कालू सिंह (वय ३३, रा. बालाजीनगर, केसनंद रोड, वाघोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अंगझडतीत ११ लाख ३८ हजारांचे ३३ ग्रॅम हेरॉइन जप्त केले. तर घरझडतीत १२१ ग्रॅम डोडाचुरा (पॉपी स्ट्रॉ) जप्त केला आहे.

पुण्यात पैशांसाठी महिलांचा छळ, दोघींनी केली आत्महत्या – सविस्तर बातमी

वाघोली पोलिसांचे पथक ३० मे रोजी केसनंद रोड परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सहायक फौजदार बाबासाहेब मोराळे, अशोक शेळके, सुनील कुसाळकर यांनी एकाला संशयातून हटकले. त्यामुळे संबंधित व्यक्ती पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पथकाने त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीत शिव कालू सिंहकडून ११ लाख ३८ हजारांचे हेरॉइन मिळून आले. त्याला अटक केल्यानंतर पथकाने त्याच्या घराची झडती घेत १२१ ग्रॅम डोडाचुरा जप्त केला. ही कामगिरी उपायुक्त प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहरे, उपनिरीक्षक मनोज बागल, साईनाथ रोकडे,अमोल सरतापे, गहिनीनाथ बोयणे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×