Breking News
Monsoon Update : महाराष्ट्रात मान्सून का लांबणीवर जातोय…कधी होणार मान्सूनला सुरवात?असहिष्णू वातावरणात विनोद फुलू शकत नाही- प्रा मिलिंद जोशीपुण्यात सायबर चोरट्यांकडून ६ कोटी २५ लाखांची फसवणूकब्युटी पार्लरमधील महिलेकडून अंगठी चोरीलाफ्लॅटबाहेर पादत्राणांच्या जाळीत चावी ठेवणे महागातमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’ जागेची पाहणीमहिलेचे दागिने हिसकावणारा चोरटा गजाआडसोशल मीडियावर कृषी विभागात नोकरीची जाहिरातवानवडीत अतिक्रमणांवर बुलडोझर; अनधिकृत टपऱ्या हटवल्याट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या तरुणाने सोडला श्वास

पुण्यात पैशांसाठी महिलांचा छळ, दोघींनी केली आत्महत्या

आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत संपवले आयुष्य

चंदननगर, वाघोलीतील घटना

marathinews24.com

पुणे – माहेरहून पैसे आणण्याच्या मागणीला कंटाळून दोन महिलांना गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटना चंदननगर आणि वाघोलीत घडल्या असून, याप्रकरणी पतीसह इतर नातेवाईकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पुण्यात हुंडाबळीसह माहेरहून पैसे आणण्याच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्येच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

येरवडा मेट्रो स्टेशनजवळ तरूणाला लुटले, धक्का देउन रोकड चोरली – सविस्तर बातमी

मोटार आणि घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत यासाठी कुटूंबियाने छळ केल्यामुळे महिलेने गळफास घेउन आत्महत्या केली आहे. ही घटना ३ जूनला चंदननगरमधील तुकारामनगरात घडली आहे. तेजस्विनी गोरख सोनवणे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती गोरख संभाजी सोनवणे (वय ३३, विशाललीला सोसायटी, तुकारामनगर) याला अटक केली आहे. तर सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संभाजी सोनवणे (वय ६२) अलका सोनवणे (वय ५५) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विनोद धुर्वे तपास करीत आहेत.

सतत पैशांच्या मागणीला कंटाळून महिलेचे गळफास घेउन आत्महत्या केली आहे. ही घटना १ जूनला वाघोलीत घडली आहे. याप्रकरणी पतीला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गणेश कांबळे (वय २५ रा. वाघोली) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. गणेश दिगंबर कांबळे (वय ३० रा. वाघोली, मूळ- हडको, नांदेड) याला अटक केली आहे. अनिता वाघमारे (रा. कलवा, ठाणे) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×