Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

निलेश घायवळ टोळीतील गुंड अटकेत

निलेश घायवळ टोळीतील गुंड अटकेत

कोथरूड पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – कोथरूडमधील गुंड निलेश घायवळच्या टोळीतील सराइताला कोथरूड पोलिसांनी अटक केली. नीलेश उर्फ चांग्या हरिशंकर शर्मा (वय ३८, रा. गुजरात काॅलनी, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शर्मा याच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाणे, तसेच जामखेड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कोथरूड गोळीबार प्रकरणात निलेश घायवळ याच्यासह साथीदारांविरुद्ध पोलिसंनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली. गु्न्हा दाखल झालेला घायवळ हा परदेशात असून, त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. घायवळ टोळीतील सराइत शर्मा हा गेल्या काही दिवसांपासून पसार झाला होता. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता.

दुचाकी वाहन चोरी करणारा चोरटा अटकेत – सविस्तर बातमी 

शर्मा हा सुतार दवाखान्याजवळील मंडईत थांबल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी विष्णू राठोड, आकाश वाल्मिकी, वैभव शीतलल यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. पोलीस उपायुक्त सागर कवडे, सहायक आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, गु्न्हे शाखेचे निरीक्षक अनिल माने, सुनील कारोटे, उपनिरीक्षक मोहन चव्हाण, मंगेश शेळके, मयूर पांढरे, श्रीकांत दगडे, दत्ता साेनवणे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×