Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

दुचाकी वाहन चोरी करणारा चोरटा अटकेत – ४ गुन्हे उघडकीस

दुचाकी वाहन चोरी करणारा चोरटा अटकेत - ४ गुन्हे उघडकीस

फरासखाना पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरात वाहन चोरीच्‍या घटना घडत असताना फरासखाना पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे. सराईत वाहन चोराला अटक करून चार गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीकडून चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे फरासखाना पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. रामेश्वर दशरथ बोडखे (वय ३२, रा. नवीन बिल्डिंग, ग्रीन पॅलेस हॉटेलजवळ, बुधवार पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सखोत तपास-पोलीस अधीक्षक – सविस्तर बातमी 

फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता. याच दरम्यान पोलिस अंमलदार गजानन सोनुने आणि चेतन होळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित रामेश्वर बोडखे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे वाहनचोरीबाबत सखोल विचारपूस करण्यात आली.

तपासात आरोपीने फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चार मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून त्याने विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या चार दुचाकी हस्तगत केल्या. या कारवाईमुळे फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेले वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून, पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत. पोलिस निरीक्षक राजेश महाला, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, प्रणिल चौगुले तसेच पोलिस अमंलदार कृष्णा निढाळकर, नितीन तेलंगे, महेश पवार, नितीन जाधव यांच्‍या पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×