Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक; संस्थानच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

संस्थानच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनस्तरावर लवकर निर्णय; दर्शनबारी प्रकल्पाला गती देण्याचे आश्वासन

marathinews24.com

पुणे – उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट देऊन संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माउलींच्या चरणी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीचे आणि सर्वांगीण विकासाचे साकडे घातले.

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य – सविस्तर बातमी

दर्शनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थानच्या विविध कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विश्वस्तांनी श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासंदर्भातील विविध प्रस्ताव, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, पायाभूत विकासकामे तसेच संस्थानसमोरील विविध प्रलंबित प्रश्न मांडले. या संदर्भातील सविस्तर निवेदनही संस्थानच्या वतीने त्यांना सादर करण्यात आले.

निवेदनातील मागण्या आणि विविध विषयांवर शासन स्तरावर सकारात्मक विचार करण्यात येईल. संबंधित विभागांशी समन्वय साधून योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिली. श्रीक्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर दर्शन बारी चा विषय मागील १२ वर्षा पासून प्रलंबित आहे तो लवकर मार्गी लावण्या बाबत ग्वाही दिली.

याप्रसंगी परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुर्हाडे तसेच आजी-माजी पदाधिकारी,

ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त श्री भावार्थ देखणे, विश्वस्त श्री योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर लोंढे, पुरुषोत्तम पाटील, ॲड रोहिणी पवार, वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×