Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

१ जुलै रोजी कृषी दिनी पुरस्कारांचे वितरण

marathinews24.com

पुणे – पुणे विभागातील पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषी फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर झाले असून १ जुलै रोजी कृषी दिनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी कळविली आहे.

प्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ पुणेतर्फे (प्रॉप) ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ राष्ट्रीय परिषदेचे ६ जुलैला आयोजन – सविस्तर बातमी

कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरीता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी, कर्मचारी यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.

विविध कृषी पुरस्कार सन २०२३ व सन २०२४ साठी महाराष्ट्र राज्यातून अनुक्रमे ९१ व ९८ शेतकरी, कर्मचारी यांना शेतकरी व कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत पुरस्कार जाहीर झाले. एकूण पुरस्कारप्राप्त शेतक-यांपैकी पुणे विभागातील अहिल्यानगर, पुणे व सोलापूर येथील २२ शेतकरी, कर्मचारी यांची निवड झाली आहे. अहिल्यानगर ५, पुणे ८ व सोलापूर जिल्ह्यातील ९ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

पुरस्कार वितरण सोहळा डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी, मुंबई-१८ येथे आयोजीत करण्यात आला आहे.

सन २०२३ मधील पुरस्कार विजेते : शिवानंद मल्लेशी शिंगडगाव ( मंद्रूप, सोलापूर) श्रद्धा सत्यवान ढवन (मोरवाडी अहिल्यानगर) कांतीलाल किसन नलगे (नागरगाव पुणे) प्रवीण दिलीप माने (बैरागवाडी सोलापूर) राहूल भारत बनकर (करकंब सोलापूर) सदाशिव मनोहर चौघुले (जुजारपूर सोलापूर) गणपतराव बाळासाहेब शिंदे (रहिमतपूर अहिल्यानगर) यतीन बापूराव घुले (काटेवाडी पुणे) प्रणव राजकुमार बिराजदार ( निंबर्गी सोलापूर) आदिवासी एकता शेतकरी गट (गुंजाळवाडी अहिल्यानगर) नविनचंद्र हरिश्चंद्र बोराडे,उप कृषी अधिकारी (मावळ पुणे)

सन २०२४ मधील पुरस्कार विजेते : समीर मोहनराव डोंबे (खोर पुणे) छाया तानाजी पवार (कुरणेवाडी पुणे) खुशालचंद्र बाबासाहेब मोरे (बारलोणी सोलापूर) योगेश नामदेव धनगर (तांदुळवाडी पुणे) सुरज सुखदेव अवताडे ( एखतपूर सोलापूर ) अमर अशोकराव भोसले (सराटी पुणे) गोवर्धन प्रल्हाद खेडकर (भालगाव अहिल्यानगर) संतोष भिकाजी धुमाळ (पेठ पुणे ) गंगाधर प्रफुल्लचंद्र बिराजदार (निंबर्गी सोलापूर) शंकर जगन्नाथ केंगले (डोण पुणे) सुखदेव ज्ञानदेव जमधडे (शेवगाव अहिल्यानगर).

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×