Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

आमदार धनंजय मुंडे यांनी घेतली घुले कुटुंबियांची भेट

१० व्या अरोपीला अटक न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले याची दि.२० जूनला चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आली होती. हॉटेलमध्ये झालेले भांडण सोडवायला गेला असता त्याच्यावर ९ जणांनी मारहाण करत चाकूने सपासप वार करून विलास घुलेला गंभीर जखमी केले होते. मात्र दि.२१ जूनला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल करा-एस. एम. देशमुख – सविस्तर बातमी

त्यानंतर सलग चार दिवस आरोपींना अटक करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करून पोलीस ठाण्यात नातेवाईकांकडून ठिय्या मांडण्यात आला होते. हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव आल्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने बीड जिल्ह्यात वातावरण तापले आहे. मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार नमिताताई मुंदडा यांनी पावसाळी अधिवेशनातील सभागृहात या हत्या प्रकरणाचे खरे सूत्रधार शोधून त्यांना अटक करा, अशी मागणी लावून धरली.

माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी विलास घुले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर आज दि.२६ जून शुक्रवार रोजी दुपारी धनंजय मुंडे यांनी टाकळी येथे जाऊन घुले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी विलास घुले यांचे बंधू रमेश घुले आणि त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. यावेळी धनंजय मुंडे यांनी झालेल्या खून प्रकरणाचा सविस्तर माहिती घेतली यावेळी रमेश घुले म्हणाले मी माझ्या भावासोबत अखेर श्वास घेईपर्यंत सोबत होतो आरोपींना पाठबळ मिळत आहे, मी आणि माझे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत अहोत, भावाला न्याय मिळायला हवा . माझ्या भावाची हत्या कट रचून केली . आम्ही तुमच्या पाठीशी आहोत न्यायात भेदभाव चालणार नाही आणि एकाला एक न्याय व एकाला एक न्याय असे जमणार नाही. खून प्रकरणातील दहावा आरोपी पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिसांनी बाहेर ठेवला आहे का? असा सवाल देखील उपस्थित केला आहे. अरोपीला अटक न झाल्यास पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतारणार असल्याचे सांगत घुले कुटुंबियांना सावरले.यावेळी टाकळी येथील ग्रामस्थ व तालुक्यातील मुंडे समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय म्हणाले धनंजय मुंडे

आमदार धनंजय मुंडे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की हि घटना उमेश माने याला मारण्यासाठी काही लोकांनी ठरवुन येऊन मारहाण चालु केली.विलास घुले हॉटेलचा मालक याला भांडण पाहून दया मया आली म्हणून भांडण सोडवायला गेला तिथे विलास घुलेला मारलं पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आणि एका आरोपीला अटक होत नाही. पोलिसांचा हा का लाडका आहे? कळत नाही. तो आरोपी मोठ्याचं लेकरू आहे म्हणून, त्याला अटक केली जात नाही. पोलीसांवर आमचा संशय आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करायचं आहे म्हणून ते अटक करत नाहीत. एकाला एक न्याय, एकाला एक न्याय. आमचं कोणाशी वैयक्तिक वाद नाही. आम्ही ताकदीने विलासला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करू. पोलीसांना आडनाव लावायचा अधिकार नाही. तो आरोपी कुठल्याही जातीचा असो त्याच्याशी घेणंदेणं नाही. मी पुन्हा सदनामध्ये हा प्रश्न उपस्थित करणार आहे.

जेजे कोणी गुंतले असतील त्याला शासन झालं पाहिजे. आदिवासी समाजाचा जो उमेश माने आहे त्याला धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही स्वस्थ बसणार नाही, आणि सरकारलाही स्वस्थ बसू देणार नाही. हि घटना काय राजकारणाची आहे का? कुणाला काय बंद पाडलंय त्यांनी जे राजकारण केलं एका व्यक्तीला उध्दवस्त करायचं होतं.

तपास झाल्यानंतर एखादा सुटला तर आमचं काही म्हणणं नाही. पोलीस यंत्रणेवर कोणाचा दबाव आहे का? हे तुम्हाला सुध्दा माहिती आहे. क्लीन होणार होतं ना २२ खुन कसे झाले. एका प्रकरणात २०० दिवस एका ठिकाणी तुम्ही बसुन होता. या प्रकरणात तुम्ही मिडीया तोच न्याय देणार का? काही झालं कि एका जातीला गुन्हेगार ठरवून टाकायचं. आता ते वाघ स्वतःलाच म्हणायला लागलेत. काय म्हणणार. या कुटुंबाची सुध्दा सांत्वनपर भेट घेण्यासाठी त्यांनी यावं, रमेश ला संरक्षण देण्याची मी मागणी एसपी कडे करणार असल्याचे आमदार धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×