Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल करा

पत्रकारांना धमकी व शिविगाळ प्रकरण; राज्यभर तक्रारी व आंदोलनाचा इशारा

marathinews24.com

मुंबई(अनंत जाधव) – पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांना अर्वाच्च शिविगाळ करणाऱ्या संजय दिना पाटील यांनी माफी मागितली असली तरी, ती आम्हाला मान्य नाही, संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचा इशारा एस. एम. देशमुख यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारथी कार्यालयास भेट – सविस्तर बातमी

शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या संजय दिना पाटील यांनी आपला सारा राग त्यांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर काढला..” पुन्हा माझ्याकडे आलात तर मारून टाकील” असे सांगत त्यांनी पत्रकारांना शिविगाळ केली.. ते एवढय़ावरच थांबले नाहीत तर “तुम्हाला कुठं जायचं तिकडं जा आणि माझी तक्रार करा” अशी मस्तवालपणाची भाषा वापरली.. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेने संजय दिनाच्या अरेरावीचा निषेध केला.. महाड, पाटण, पिंपरी चिंचवड, नांदेड आदि ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रारी आणि निवेदन देण्यात आली. सर्व वाहिन्यांवरून निषेधाचे सूर व्यक्त झाले. राजकीय पक्षांनी देखील निषेध केल्यानंतर संजय दिना पाटील यांना उपरती झाली. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपला माफीनामा सादर केला.

मात्र अगोदर अर्वाच्च शिविगाळ करायची, काय करायचं ते करा म्हणत धमकी द्यायची आणि प्रकरण अंगलट आलं की माफी मागायचं नाटक करायचं ही नौटंकी आम्हाला मान्य नाही.असे एस. एम. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. तुम्ही अपराध केला आहे त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे” अशी आमची मागणी असून त्यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मिडिया परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती उद्या ठिकठिकाणी पोलिसात तक्रारी देऊन गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरतील तसेच जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना निवेदन देऊन संजय दिना यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करतील असेही एस. एम. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×