Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

पुण्यात गणेश पेठेत भरदिवसा घरफोडी

मोबाइल विक्री दुकानात चोरी; २० मोबाईल चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गजबजलेल्या गणेश पेठेत चोरट्यांंनी एका इमारतीतील घरातून एक लाख ६८ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली.
याबाबत एकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश घायवळ टोळीतील गुंड अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कुटुंबीयांसह गणेश पेठेतील शाहीर बिल्डींगमध्ये राहायला आहेत. गुरुवारी (२५ जून) चोरटे खिडकीतून तक्रारदाराच्या घरात शिरले. चोरट्यांनी कपाटातून एक लाख ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास कपाटातील दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक लाला लोणकर तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हडपसर, सिंहगड रस्ता भागात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली.

मोटारीच्या धडकेत एकाचा मृत्यू

मोटारीच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज भागातील शेलार मळा परिसरात घडली. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विलास मारुती धांडे (वय ४३, रा. शिवशंभोनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा अरुण (वय २१) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून रोजी विलास धांडे हे दुपारी एकच्या सुमारास शेलार मळा परिसरातील एका झाडाखाली झाेपले होते. त्यावेळी मोटारीच्या चाकाखाली सापडून ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमीला वैद्यकीय मदत न करता मोटार चालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या धांडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×