Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

प्रितम मुंडेंनी घेतली घुले कुटुंबियांची भेट; कुटुंबियांना अश्रू अनावर

प्रितम मुंडेंनी घेतली घुले कुटुंबियांची भेट; कुटुंबियांना अश्रू अनावर

ॲड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची कुटूंबियांची मागणी

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणाचे पावसाळी अधिवेशनात पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. याप्रकरणातील दोषी ९ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुरवणी जबाबात खासदारपुत्र सौरभ सोनवणे याचे नाव समाविष्ट केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विलास घुले कुटुंबियांच्या सांत्वन करण्यासाठी गुरुवारी (दि.२५) गुरुवारी माजी खासदार प्रितम मुंडे यांनी टाकळीत जाऊन घुले कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मुंडे यांच्यासमोर अत्यंत भावूक होऊन अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

पुण्यातील कॅफेत दोघांनी रचला कट, व्हिडिओ व्हायरल – सविस्तर बातमी 

प्रितम मुंडे यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणत कुटुंबियांना आधार दिला. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. विलास घुले यांची काही दिवसांपूर्वी चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, प्रीतम मुंडे या टाकळी येथे घुले कुटुंबीयांच्या घरी दाखल झाल्या. त्यांनी कुटुंबीयांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यावेळी प्रीतम मुंडे यांना पाहताच विलास घुले यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. कुटुंबीयांनीही पोलिस प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित पोलीस निरीक्षकांवर कारवाईची मागणी केली आहे.

काय म्हणाल्या प्रीतम मुंडे

विलास घुले यांच्यासोबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून बीड जिल्ह्याला काळिमा फासणारी आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका निरपराध व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेचा मी तीव्र निषेध करते. या कुटुंबाला न्याय मिळवून देणे हे सरकार आणि समाज म्हणून आपले कर्तव्य आहे. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सांगितले की, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई झाल्याचे दिसून येते. वेळेत योग्य सहकार्य मिळाले असते तर कुटुंबीयांवर मृतदेह ४८ तास ठेवण्याची वेळ आली नसती. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला किमान अंत्यसंस्कार तरी सन्मानाने करता यावेत, अशी अपेक्षा असते,असेही त्या याप्रसंगी म्हणाल्या.

खासदार पुत्राचे नाव प्रकरणात जोडले जात असल्याबाबत विचारले असता, तपास यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, मी जिल्ह्याची लेक म्हणून या कुटुंबासाठी न्याय मागण्याचा मला अधिकार आहे. तपास यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत नसेल आणि कुटुंबाला न्याय मिळत नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, घुले कुटुंबीयांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी तसेच संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी यावेळी घुले कुटुंबियांनी केली आहे.

काय म्हणाले मृत विलास घुले यांचे बंधू

रमेश घुले म्हणाले काल परवा कुणीतरी मला सांगितले की कुणी तरी बीडचा वाघ असल्याचे वक्तव्य केले. वाघाने माझ्या भावाला खाल्ले आता तो वाघ मलाही आणि माझ्या कुटुंबाला खाईल मग संपलं सगळं म्हणून मला आता पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि माझ्या भावाच्या खून प्रकरणातील आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी आणि तसेच याप्रकरणात माझ्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी ही केस लढविण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्तीची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्व. विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×