Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

लष्करी गणवेश शिवण्याच्या बतावणीने टेलरिंग व्यावसायिकाची फसवणूक

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – लष्करी गणवेश शिवण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी टेलरिंग व्यावसायिकाची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध लष्कर पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. याबाबत एका टेलरिंग व्यावसायिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात गणेश पेठेत भरदिवसा घरफोडी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण टेलरिंग व्यावसायिक आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांसाठी ४१ ब्लेझर सूट (गणवेश) शिवायचे आहेत, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. गणवेश शिवण्याच्या कामात चांगले पैसे मिळतील. सुरुवातीला काही अनामत रक्कम भरावी लागेल, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना काही पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणाने ऑनलाइन पद्धतीने चोरट्यांच्या खात्यात पाच लाख पाच हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन चोरमले तपास करत आहेत.

‘आरटीओ’चे बनावट चलन पाठवून १४ लाखांची फसवणूक

प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ)दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे बनावट चलन एपीके फाईलच्या माध्यमातून पाठवून सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोघांची १४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरमी सिंहगड रस्ता आणि खराडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर भागात राहणाऱ्या एका ५४ वर्षीय तक्रारदाराला बनावट आरटीओ चलन एपीके फाईलच्या माध्यमातून पाठवून ११ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी खराडी भागातील एकाची तीन लाख ५० हजारांची फसवणूक केली. याबाबत एकाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक पालकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×