गुंड आंदेकर टोळीतील पसार सराईताला अटक

युनीट एकने कोयत्यासह घेतले ताब्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर टोळीतील सराईत पसार आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून कोयता, मोबाइल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ओम गणेश नगरकर (वय २४ रा. हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मागील आठ महिन्यांपासून तो पसार झाला होता. त्याच्याविरूद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाॅटेल व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

गुंड बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्यात मागील काही महिन्यांपासून वाद सुरू आहेत. त्यातच टोळीयुद्धातून खून, खूनाचा प्रयत्न करीत एकमेकांवर शह दिला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर संबंधित गुंड टोळीवर वॉच ठेउन कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, युनीट एक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमलदार नीलेश साबळे, हेमंत पेरणे यांना आंदेकर टोळीतील सराईताची माहिती मिळाली. तो हडपसरमध्ये कॅनोलजवळ गुन्हा करण्याच्या तयारीत असताना पथकाने त्याठिकाणी धाव घेतली.

गुंड ओम नगरकर याला ताब्यात घेउन त्याच्याकडून कोयता, मोबाइल असा ऐवज जप्त करण्यात आला. दरम्यान, समर्थ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ओम नगरकर मागील ८ महिन्यांपासून फरार होता. त्याला गुन्हे शाखेच्या युनीट एकने शिताफिने पकडले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, एसीपी शैलेश संखे, पोलीस निरीक्षक अजित जाधव, उपनिरीक्षक राहूल मखरे, विनोद शिंदे, नीलेश साबळे, हेमंत पेरणे, सिद्धेश्वर वाघमारे, सुहास डोंगरे, संदेश काकडे, अमित जमदाडे, मयूर भोसले, अविनाश दळवी यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×