- तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
marathinews24.com
पुणे – शहरातील चंदननगर भागात घरफोडी करुन पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून सोने-चांदीचे दागिने, तसेच रिक्षा असा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रोहित नितीन गायकवाड (वय २८, रा. कृष्णानगर, महमदवाडी, हडपसर), मनीष सुजीत नागपुरे (रा. सर्वोदय काॅलनी, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंदननगर भागात एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याची घटना घडली होती.
बीडच्या पुरुषोत्तमपुरीत भाविकांची बोट पाण्यात बुडाली – सविस्तर बातमी
गुन्हा केल्यानंतर चोरटे रिक्षातून पसार झाले होते. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. चोरट्यांनी पसार होताना वापरलेल्या रिक्षाचा क्रमांक पोलिसांना चित्रीकरणात दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी रिक्षाचा शोध घेतला. आरोपी गायकवाड घरफोडी करुन सोलापूरला पसार झाला होता. तांत्रिक तपासात ही माहिती मिळाल्यानंतर त्याला सोलापूरमधून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदार नागपुरे याच्या मदतीने गुन्हा केल्याची माहिती दिली. चोरलेल्या दागिन्यांची विक्री चोरट्यांनी हडपसर, वानवडीतील सराफांना विकल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दागिने, तसेच गु्न्हा करण्यासाठी वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली.
परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ट पोलीस निरीक्षक नीलेश बडाख, गु्न्हे शाखेचे निरीक्षक अमोल धस, उपनिरीक्षक किरण नरवडे, पोलीस कर्मचारी मेमाणे, डांगे, कदम, घावटे, किरण घुटे, लहाने, बेंद्रे, तसेच लष्कर वाहतूक विभागातील सहायक फौजदार गणेश येळे, लोकरे यांनी ही कामगिरी केली.
























