हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील हडपसर परिसरातील साडेसतरा नळी याठिकाणाहून चोरट्याने फ्लॅटमध्ये शिरून तब्बल ७ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना २५ नोव्हेंबर २०२५ ते ७ जून २०२६ कालावधीत कुमार पिकासो सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी हडपरमध्ये राहणार्या ४३ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
गांजा तस्कराचा आरोप, लुटमार करणार्यांना अटक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसर परिसरातील साडेसतरानळी परिसरात राहायला आहे. नोव्हेंबर २०२५ ते जून २०२६ कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये शिरून ७ लाखांचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर महिलेने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करीत आहेत.
धनकवडीत दोन मोबाइल, लॅपटॉप चोरीला
खोलीचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने दोन मोबाइल आणि लॅपटॉप असा मिळून ८७ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १० जूनला सकाळी साडेसहाच्या सुमारास धनकवडीतील कुंदननगरात घडली आहे. याप्रकरणी २६ वर्षीय तरूणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस अमलदार सूर्यवंशी तपास करीत आहेत.



















