Breking News
पुण्यात गांजा विक्रीसाठी आलेला तस्कर जेरबंदसराईत मोबाइल चोरट्याला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्याशिवीगाळ केल्याने झाडल्या गोळ्या, जीम मालक जखमीआम्ही जेलमध्येही जायला तयार, धमेंद्र प्रधान राजीनामा द्या – अभिजित दीपकेपुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणास ३० जूनपर्यंत मुदतवाढ; सुमारे ७० टक्के करारनामे जमाराज्य उत्पादन शुल्क विभागाच्याच्या कारवाईत एकूण १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त-अतुल कानडेविभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीची आढावा बैठक संपन्नप्रवासात महिलांच्या दागिन्यांवर डल्लाहडपसरमध्ये घरातून ७ लाखांचे दागिने चोरीलागांजा तस्कराचा आरोप, लुटमार करणार्‍यांना अटक

सराईत मोबाइल चोरट्याला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सराईत मोबाइल चोरट्याला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दीड लाखांच्‍या ११ मोबाईल जप्‍त

marathinews24.com

पुणे – शहरातील कोंढवा परिसरात मोबाईल चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या सराईत चोरट्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ११ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. या कारवाईमुळे मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. उमर सलीम शेख (वय २१, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

शिवीगाळ केल्याने झाडल्या गोळ्या, जीम मालक जखमी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी कोंढवा परिसरातील एका नागरिकाचा मोबाईल फोन चोरीला गेला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना तपास पथकातील पोलिस अंमलदारांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिवनेरीनगर परिसरातील एक तरुण चोरीचे मोबाईल विक्रीसाठी ग्राहक शोधत आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून उमर शेख याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरीचा मोबाईल आढळून आला. अधिक चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणांहून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान आरोपीकडून एकूण ११ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक रविंद्र गावडे यांच्यासह पोलिस अंमलदार रविंद्र चिप्पा, अमोल हिरवे, सचिन कोकरे, पुष्पेंद्र चव्हाण, केशव हिरवे, प्रशांत खाडे, संतोष बनसोडे, सूरज शुक्ला, अमित सूर्यवंशी, रियाज पटेल यांच्‍या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×