Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

शिवीगाळ केल्याने झाडल्या गोळ्या, जीम मालक जखमी

शिवीगाळ केल्याने झाडल्या गोळ्या, जीम मालक जखमी

पुण्यात आरोपीला अटक, तिघे अल्पवयीन ताब्यात

marathinews24.com

पुणे – गाडी पार्किंगच्या वादातून शिवीगाळ केल्यामुळे टोळक्याने जीम मालक तरूणावर गोळ्या झाडून कोयत्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि.१०) सहकारनगरातील तळजाई डोंगर परिसरात घडली आहे. सुदैवाने गोळीबारातून तरुण बचावला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आदित्य विष्णू थोपटे (वय २१ रा. जनता वसाहत) याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली असून, तिघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. योगेश बनेकर (वय ३४, रा. धनकवडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रवासात महिलांच्या दागिन्यांवर डल्ला – सविस्तर बातमी 

योगेश बनेकर याची बिबवेवाडी परिसरात जीम असून ते ट्रेनर आहेत. आरोपी थोपटे आणि योगेश यांची तीन महिन्यांपुर्वी गाडी पार्क करण्यावरून वादविवाद झाले होते. तेव्हा योगेशने आरोपीला शिवीगाळ केली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्याच रागातून टोळक्याने योगेश बुधवारी रात्री जीम बंद करून घरी निघाले होते. त्यावेळी तळजाई डोंगर येथील बिकानेर चौकात ते फळे घेण्यासाठी रस्त्यात थांबले. गाडी लावत असतानाच पाठिमागून आलेल्या चौघा आरोपींनी त्यांच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी योगेशच्या मानेला चाटून गेली. गोळीचा आवाज येताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली. योगेशने तेथून पळ काढला.

असा घडला गोळीबार थरार

चारही आरोपींनी त्याच्यामागे धावत पुन्हा दुसरी गोळी झाडली. गोळी चुकल्यानंतर योगेश उलट्या दिशेने पळाला. त्यानंतर एकाने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यात डोक्यात कोयता लागला. त्यानंतर आरोपींनी तिसरी गोळी झाडली. मात्र, सुदैवाने तिसरी गोळी चुकली गेली. कोयत्यानेच्या हल्यात योगेश गंभीररित्या जखमी झाला. पसार झालेल्या आरोपींचा माग काढत काही तासात आरोपींना जेरबंद केले. दरम्यान, आरोपी हा तळजाई वसाहत परिसरात राहायला असून, त्यांच्यावर यापुर्वीचे गुन्हे नोंद आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×