Breking News
राज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागूनाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी कराविषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभराज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभात तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा सन्मान-सचिन हाकेकेंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे-डॉ. नीलम गोऱ्हेपुरावा मिळू नये म्हणून बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडने रचला कट‘राष्ट्रप्रथम’ ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्यांच्या मनात रुजवली-पांडुरंग बलकवडे

प्रवासात महिलांच्या दागिन्यांवर डल्ला

प्रवासात महिलांच्या दागिन्यांवर डल्ला

पुण्यात पीएमपीएल, एसटी प्रवासात दागिने चोरीला

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बससह एसटी प्रवास करणार्‍या महिलांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. याप्रकरणी समर्थ आणि वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रामुख्याने मागील काही दिवसांपासून बसप्रवास करणार्‍या महिलांना लक्ष्य करीत त्यांच्याकडील ऐवज चोरीच्या घटनांचा आलेख वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हडपसरमध्ये घरातून ७ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

पीएमपीएल बसने प्रवास करणार्‍या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना ९ जूनला सकाळी साडेनउच्या सुमारास रामोशी गेट परिसरात घडली आहे. याप्रकरणी धनकवडीत राहणार्‍या महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार महिला बसने प्रवास करीत असताना त्यांच्या मागे बसलेल्या महिला चोरट्याने तक्रारदार जेष्ठेच्या गळ्यातील दीड लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. पोलीस अमलदार डमाळे तपास करीत आहेत.

एसटी प्रवासात १० लाख ५५ हजारांचे दागिने चोरीला

एसटी प्रवासात गर्दीचा फायदा घेउन दोन चोरट्या महिलांनी ५४ वर्षीय महिलेच्या बॅगेतून तब्बल १० लाख ५५ हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना ६ जूनला दुपारी तीनच्या सुमारास मुढा ते मुुंबई सेंट्रल एसटीमध्ये प्रवास करताना नवले ब्रीज परिसरात घडली आहे. याप्रकरणी नवी मुंबईत राहणार्‍या महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोन महिला चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×