Breking News
आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत संपवले आयुष्यमुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करावेतमोटारीची धडक देऊन महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्नपुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ काेटीची फसवणूककटफळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित कराएमबीबीएसला अ‍ॅडमिशनचे नाव अन लुटीचा डावउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतला ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावापुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदीपुणे जिल्ह्यात अवैध दारूमाफियांवर धडक कारवाईपेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी

एमबीबीएसला अ‍ॅडमिशनचे नाव अन लुटीचा डाव

एमबीबीएसला ॲडमिशनचे नाव अन लुटीचा डाव

आरोपीला बेड्या, असंख्य विद्यार्थ्यांची फसवणूक उघडकीस

marathinews24.com

पुणे – एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळवून देण्याच्या नावाखाली राज्यभरातील असंख्य विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्‍या आरोपीला येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने आतापर्यंत ४० विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशनचे आमिष दाखवून पैसे घेत प्रवेशाची खोटी प्रमाणपत्रे दिल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याविरूद्ध हैद्राबाद आणि मुंबईत अशाच प्रकारे फसवणूकीचे ६ गुन्हे दाखल आहेत. आदित्यकुमार उर्फ अरविंद प्रकाश कुमार आरोगोंडा (वय ४७ रा. सिकंदराबाद, तेलंगणा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी – सविस्तर बातमी 

मेडीकल कॉलेजला प्रवेश मिळवून देण्याची बतावणी करीत आरोपी आरोगोंडाने एकाकडून ८ लाख १२ हजार रूपये उकळून फसवणूक केली. याप्रकरणी १८ मार्चला येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपासादरम्यान संबंधित आरोपी मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. येरवड्यातील गुन्ह्यात पोलिसांनी त्याला न्यायालयाकडून वर्ग करून तपास केला. त्यावेळी त्याने साथीदाराच्या मदतीने इडुव्हिओ लर्निंग सोल्युशन प्रा. लि. नावाची कंपनी हैद्राबादमध्ये स्थापित केल्याचे सांगितले. त्या कंपनीच्या शाखा पुणे, मुंबईत सुरू करून विद्यार्थ्यांना एमबीबीएससाठी अ‍ॅडमिशन मिळवून देण्याची सोशल मीडियावर जाहिरात केली.

सरकारी महाविद्यालयीन प्रवेशासाठी ५ लाख, खासगी कॉलेजमधील प्रवेशासाठी ३ लाख रूपये काउंसेलिंग फी त्याने ठेवली. अ‍ॅडमिशन न झाल्यास पैसे परत देण्याची हमी तो देत होता. त्याद्वारे त्याने ४० विद्यार्थ्यांना प्रवेशाचे आमिष दाखवून लाखो रूपये उकळले. मात्र, त्यांचे अ‍ॅडमिशन न करता बनावट प्रमाणपत्र देउन फसणूक केल्याचे उघडकीस आले. अशाप्रकारे त्याने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. ही कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, एसीपी सुनील जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक किशोर बेरड, मुकूंद कोकणे, शैलेश वाबळे, संदीप जायभाय, साईनाथ म्हस्के यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×