Breking News
आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत संपवले आयुष्यमुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करावेतमोटारीची धडक देऊन महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्नपुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ काेटीची फसवणूककटफळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित कराएमबीबीएसला अ‍ॅडमिशनचे नाव अन लुटीचा डावउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतला ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावापुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदीपुणे जिल्ह्यात अवैध दारूमाफियांवर धडक कारवाईपेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी

आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत संपवले आयुष्य

पहिल्या पत्नीसह सासरच्या ६ जणांवर गुन्हा

marathinews24.com

पुणे – पत्नीसह तिच्या कुटुंबीयांकडून आणि मित्राकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून धायरी येथील ३७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्याला दिल्या जात असलेल्या त्रासाची व्यथा मांडली असल्‍याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी पहिल्या पत्नीसह तिच्या कुटुंबातील पाच सदस्य आणि एका मित्राविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मोटारीची धडक देऊन महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

सुशांत सुबराव भोसले (वय ३७, रा. मरिगोल्ड, बारंगणी मळा, धायरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे मोठे बंधू प्रशांत सुबराव भोसले (वय ४०, सध्या रा. वेस्ट कोस्ट पार्क, शिवणे; मूळ रा. आरवडे, ता. तासगाव, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पुनम सुखदेव शिंदे (पहिली पत्नी), सुखदेव मारुती शिंदे, छाया सुखदेव शिंदे, आकाश सुखदेव शिंदे, निलम जाधव आणि अजय शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत भोसले हे धायरी येथील मधुश्री सोसायटीत वास्तव्यास होते. मुंबईत एका खासगी कंपनीत ते नोकरी करत होते. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर ते एकटे राहत होते. ३ मे २०२६ रोजी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, तपासादरम्यान सुशांत यांच्‍या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ सापडला. या व्हिडिओत त्यांनी आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या घटनांचा उल्लेख केला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, २०१७ पासून आत्महत्येपर्यंतच्या कालावधीत पुनम शिंदे हिने वारंवार पैशांची मागणी केली. तसेच तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्र अजय शेळके यांनी मिळून सुशांत यांना मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या सततच्या त्रासामुळे ते प्रचंड तणावाखाली गेले होते. अखेर या जाचाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये सुशांत यांनी पत्नी, तिचे आई-वडील, भाऊ, बहीण आणि मित्राकडून होत असलेल्या कथित छळाचा घटनाक्रम सांगितला आहे. या व्हिडिओची पडताळणी, फिर्यादीतील आरोप आणि अन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत करीत आहेत. आत्‍महत्‍येनंतर पोलिसांना हा व्हिडिओ मिळाल्याने तपासाला नवी दिशा मिळाली आहे.

 पहिल्या पत्नीसह सासरच्या ६ जणांवर गुन्हा

पुणे- पत्नीसह तिच्या कुटुंबीयांकडून आणि मित्राकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून धायरी येथील ३७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्याला दिल्या जात असलेल्या त्रासाची व्यथा मांडली असल्‍याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी पहिल्या पत्नीसह तिच्या कुटुंबातील पाच सदस्य आणि एका मित्राविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सुशांत सुबराव भोसले (वय ३७, रा. मरिगोल्ड, बारंगणी मळा, धायरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे मोठे बंधू प्रशांत सुबराव भोसले (वय ४०, सध्या रा. वेस्ट कोस्ट पार्क, शिवणे; मूळ रा. आरवडे, ता. तासगाव, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पुनम सुखदेव शिंदे (पहिली पत्नी), सुखदेव मारुती शिंदे, छाया सुखदेव शिंदे, आकाश सुखदेव शिंदे, निलम जाधव आणि अजय शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत भोसले हे धायरी येथील मधुश्री सोसायटीत वास्तव्यास होते. मुंबईत एका खासगी कंपनीत ते नोकरी करत होते. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर ते एकटे राहत होते. ३ मे २०२६ रोजी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, तपासादरम्यान सुशांत यांच्‍या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ सापडला. या व्हिडिओत त्यांनी आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या घटनांचा उल्लेख केला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, २०१७ पासून आत्महत्येपर्यंतच्या कालावधीत पुनम शिंदे हिने वारंवार पैशांची मागणी केली. तसेच तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्र अजय शेळके यांनी मिळून सुशांत यांना मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या सततच्या त्रासामुळे ते प्रचंड तणावाखाली गेले होते. अखेर या जाचाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये सुशांत यांनी पत्नी, तिचे आई-वडील, भाऊ, बहीण आणि मित्राकडून होत असलेल्या कथित छळाचा घटनाक्रम सांगितला आहे. या व्हिडिओची पडताळणी, फिर्यादीतील आरोप आणि अन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत करीत आहेत. आत्‍महत्‍येनंतर पोलिसांना हा व्हिडिओ मिळाल्याने तपासाला नवी दिशा मिळाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×