Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

मोटारीची धडक देऊन महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न

मोबाइल विक्री दुकानात चोरी; २० मोबाईल चोरीला

गुन्हा दाखल केल्याच्या रागातून आरोपींचे कृत्य

marathinews24.com

पुणे – भांडणातून दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेला मोटारीची धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोटार चालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडकेत वसुधा धनंजय गरड (वय २९, रा. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, येरवडा) जखमी झाल्या आहेत. त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ काेटीची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार वसुधा गरड गुरुवारी (११ जून) दुपारी दीडच्या सुमारास येरवड्यातील शांतिरक्षक सोसायटी परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी आराेपी त्यांच्या मागावर होते. शांतिरक्षक सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर मोटारीने दुचाकीला धडक दिली. ‘आमच्याविरुद्ध दाखल केलेला गु्न्हा मागे घे. आता तू वाचली आहे. पुढच्या वेळी काटा काढू’, अशी धमकी देऊन आरोपी मोटारीतून पसार झाले, असे गरड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक खेडकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×