महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेने ग्राहक महिलेची ३० हजार रुपयांची अंगठी चोरुन नेल्याची घटना नांदेड सिटी भागात घडली. या प्रकरणी ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ब्युटी पार्लर मालक महिलेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फ्लॅटबाहेर पादत्राणांच्या जाळीत चावी ठेवणे महागात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड सिटी परिसरात ब्युटी पार्लर आहे. ११ जून रोजी दुपारी ब्युटी पार्लरमध्ये एक महिला आली होती. महिलेने तेथील टेबलवर अंगठी ठेवली होती. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून ब्युटी पार्लरमधील महिलेने सोन्याची अंगठी चोरली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सुरेश खरमाटे तपास करत आहेत.
प्रवासी ज्येष्ठ महिलेची बांगडी लांबविली
पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेची बांगडी चोरट्यांनी कटरचा वापर करुन लांबविल्याची घटना मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला मूळच्या बीडमधील आहेत. त्या शुक्रवारी (१२ जून) सकाळी अकराच्या सुमारास पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. गर्दीत शिरलेल्या चोरट्यांनी कटरचा वापर करुन महिलेच्या हातातील ५० हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरुन नेली.























