Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

फ्लॅटबाहेर पादत्राणांच्या जाळीत चावी ठेवणे महागात

फ्लॅटबाहेर पादत्राणांच्या जाळीत चावी ठेवणे महागात

चोरट्याने १ लाख ४१ हजार रुपयांच्या दागिन्यावर मारला डल्ला

marathinews24.com

पुणे – फ्लॅट बाहेर पादत्राणांच्या जाळीत (शू रॅक)  चावी ठेवणे महागात पडले. चावीचा वापर करुन चोरट्याने सदनिकेत प्रवेश करुन कपाटातील १ लाख ४१ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना नुकतीच लोणी काळभोरमध्ये घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महिलेचे दागिने हिसकावणारा चोरटा गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती परिसरात असलेल्या साईरंग सोसायटीत राहायला आहे. कामानिमित्त बाहेर तरुण आणि त्याचे कुटुंबीय बाहेर जात असल्याने त्यांनी चावी सदनिकेच्या बाहेर असलेल्या पादत्राणांच्या जाळीत लपवून ठेवली होती. चोरट्याने पादत्राणाच्या जाळीत लपवून ठेवलेली चावी घेतली. त्यानंतर सदनिकेचे कुलूप चावीने उघडून प्रवेश केला. शयनगृहातील कपाटातून १ लाख ४१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.

सदनिकेत चोरी करणारा चोरटा माहितगार असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस कर्मचारी सागर जगदाळे तपास करत आहेत. दरम्यान, फ्लॅटबाहेर पादत्राणाच्या जाळीत, कुंडीत, तसेच दरवाज्याच्या फटीत ठेवलेली चावी चोरून सदनिकेतून दागिने लांबविण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×