Breking News
पुण्यातील अनेकांची बँकखाती पोलिसांच्या रडारवरपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा मानकरी ठरला मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगेकृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देशी गोवंश प्रदर्शन व परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटनदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण मोहीमेअंतर्गत साडेसात हजार वृक्ष लागवडीचा संकल्पराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा २३ व २४ जुलै रोजी पुणे दौरावाहने चोरणारा अल्पवयीन ताब्यात, ४ गाड्या जप्तबिटवाईज–मर्सिडीज बेंझ परिसरात उड्डाणपुलाची मागणीAjit Pawar : कष्टकर्‍यांच्या वेदनेने कळवळणारा पहाड..!दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादनविवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची साडेचार लाखांची फसवणूक

माऊली’ नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा भावस्पर्शी आविष्कार

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २२ जुलैला पुण्यात आयोजन

marathinews24.com

पुणे – शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त ‘माऊली’ या विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. २२) सायंकाळी साडे पाच वाजता भरत नाट्य मंदिरात विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.

वास्तुरचनाकारांनी नवतंत्रज्ञानासह प्रयोगशील व सर्जनशील वृत्ती अंगीकारावी – सविस्तर बातमी

‘माऊली’ हा संत ज्ञानेश्वरांच्या जीवन प्रवासावर आधारित नाट्यमय सांस्कृतिक आविष्कार असून, त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, अध्यात्म, भक्ती, समाजप्रबोधन आणि मानवतेचा संदेश प्रभावी रंगमंचीय सादरीकरणातून उलगडण्यात येणार आहे. संगीत, अभिनय, नृत्य आणि नेपथ्य यांच्या सुरेख संगमातून संत परंपरेचा वैभवशाली वारसा रसिकांसमोर साकारला जाणार आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या साहित्य, विचार आणि अध्यात्माच्या माध्यमातून समाजाला समता, करुणा, विश्वबंधुत्व आणि मानवकल्याणाचा संदेश दिला. ‘दुरितांचे तिमिर जावो’ हा त्यांच्या पसायदानमधील सार्वकालिक संदेश आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे.

संत ज्ञानेश्वरांचे जीवनकार्य आणि त्यांची आध्यात्मिक परंपरा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तर ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, ‘माऊली’ हा कार्यक्रम त्या उपक्रम मालिकेतील एक महत्त्वाचा सांस्कृतिक उपक्रम आहे.महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. राज्याच्या समृद्ध संतपरंपरेचे, आध्यात्मिक वारशाचे आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, पुणे व परिसरातील वारकरी, कला रसिक, विद्यार्थी, संशोधक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक व सांस्कृतिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×