Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

पानपट्टीवर धक्का लागल्याने तरुणाचा खुनाचा प्रयत्न

हडपसरमधील घरफोडीचा पोलिसांनी लावला छडा

खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – पानपट्टीवर सिगारेट खरेदी करताना धक्का लागल्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना खडकी परिसरात घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.अभिजित प्रदीप मोरे (वय ३१, रा. चव्हाण वस्ती, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खडकी बाजार ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी अरमान याच्यासह तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोरे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या इलेक्ट्रिक कारला आग – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे हे १९ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास खडकी बाजार परिसरातील एका पानपट्टीवर सिगारेट खरेदी करत होते. त्या वेळी सिगारेट खरेदी करताना मोरे यांचा आरोपीला चुकून धक्का लागला. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपींनी मोरे यांना शिवीागळ केली. त्यांना मारहाण करुन तीक्ष्ण शस्त्राने डोक्यात वार केला, तसेच बांबू आणि पट्ट्याने मारहाण केली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक श्रृती सरोदे तपास करत आहेत.

वादातून बहिणीच्या डोक्यात पाट मारला

दारू पिऊन घरी आलेल्या एकाने बहीण, तसेच आईला शिवीगाळ करुन बहिणीच्या डोक्यात स्वयंपाकघरातील लाकडी पाट घातल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. या घटनेत आरोपीची बहीण जखमी झाली. या प्रकरणी आरीफ शेख (रा. भीमनगर, विश्रांतवाडी) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरोपीची बहीण आफरीन समीर शेख (वय ५५) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला दारू पिण्याचे व्यसन आहे. १६ जुलै रोजी तो रात्री साडेआठच्या सुमारास घरी आला. दारुच्या नशेत त्याने आई आणि बहिणीला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने बहिणीच्या डोक्यात स्वयंपाकघरातील पाट मारला. पोलीस हवालदार माळी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×