Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

पुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या इलेक्ट्रिक कारला आग

पुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या इलेक्ट्रिक कारला आग

सुदैवाने जीवितहानी टळली; आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

marathinews24.com

पुणे – धावत्या इलेक्ट्रॉनिक मोटारीला आग लागल्याची घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास नवले पुलाजवळील भूमकर पुलावर घडली. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नसून, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी धाव घेतली.आगीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. काही काळ महामार्गावर धुराचे मोठे लोट पसरल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती.

वडिलांच्या खूनाचा घेतला बदला, टोळीला अटक – सविस्तर बातमी 

अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इलेक्ट्रॉनिक मोटार चालक रात्री आठच्या सुमारास भूमकर पुलावरून पुढे जात होता. त्यावेळी त्याला गाडीच्या बोनेटमधून धूर येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने गाडी रस्त्यात उभी करून बाजूला गेला. त्यानंतर काही वेळातच गाडीने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दल, महामार्ग प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

आगीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×