Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

वडिलांच्या खूनाचा घेतला बदला, टोळीला अटक

Pune revenge murder case

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, राजगड पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – वडिलांचा झालेल्या खूनाचा तब्बल २३ वर्षांने मुलाने बदला घेतला आहे. साथीदारांच्या मदतीने त्याने संबंधिताचा खून  केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसह राजगड पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी एकाकडून गावठी पिस्तूलासह ३ काडतुसे जप्त केली आहेत.

बंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी झाला पसार – सविस्तर बातमी 

संजय बाबूराव कडू देशमुख (वय ४० रा. भैरवनाथ मंदिराजवळ, मुंढवा, मूळ रा.कुरण पानशेत ता. वेल्हा ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मंथन दिनेश वैदय, सौरभ सागर परदेशी (दोघेही रा. सदाशिव पेठ जोशीवाडा) मिझान गॅसउददीन शेख (रा. पर्वतीदर्शन चौकीजवळ) संदीप बाबुलाल कोरी (रा. पर्वतीदर्शन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही खूनाची घटना ११ जुलैला शिंदेवाडी ता. भोर याठिकाणी उघडकीस आली होती.

शिंदेवाडीजवळ कात्रज जुना बोगद्यापुढे संजय देशमुख यांच्यावर वार करून त्यांचा खून केल्याची घटना ११ जुलैला उघडकीस आली होती. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी मंथन वैद्य, सागर परदेशी यांना १४ जुलैला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी इतर दोघांच्या मदतीने देशमुख यांचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी मिझान शेख आणि संदीप कोरी यांना अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक संतोष जाधव, एपीआय चेतन मछले, उपनिरीक्षक युवराज धोंडे, संतोष तोडकर, संतोष भापकर विशाल भोरडे किरण बर्काले, निलेश राणे, अडवाल, नाना मदने, गायकवाड, मयुर निंबाळकर, राजेंद्र मुंढे, प्रधान, कोंढाळकर, मेस्त्री, भालेराव, शिंदे, नलावडे यांनी केली.

वडिलांच्या खूनातील आरोपीचा केला खून

आरोपी मंथन दिनेश वैद्य याचे वडील दिनेश वैद्य यांचा २००३ मध्ये संजय कडु देशमुख याने खुन केला होता. त्या कारणावरुन आरोपींनी कट रचून देशमुखचा खुन केला आहे. यातील आरोपी संदीप कोरी याच्याकडून गावठी पिस्तूल, ३ कातडुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×